क्रोल अहवाल (Kroll Report) २०२५: १७७.९ दशलक्ष अमेरिकन डॉलर्सच्या ब्रँड मूल्यासह बॉलीवूड अभिनेता शाहरुख खान भारतीय सेलिब्रिटींच्या यादीत अव्वल स्थानावर विराजमान झाला आहे.

ठळक मुद्दे:

  • अमेरिकन जागतिक आर्थिक सल्लागार संस्था 'क्रोल' (Kroll) ने 'क्रोल सेलिब्रिटी ब्रँड मूल्यमापन (Kroll Celebrity Brand Valuation) २०२५' या अहवालाची ११ वी आवृत्ती प्रसिद्ध केली आहे.
  • सदर अहवालानुसार, बॉलीवूड अभिनेता शाहरुख खान याने १७७.९ दशलक्ष अमेरिकन डॉलर्सच्या ब्रँड मूल्यासह भारतातील सर्वात मौल्यवान सेलिब्रिटी ठरत या क्रमवारीत अव्वल स्थान पटकावले आहे.
  • १६२.९ दशलक्ष अमेरिकन डॉलर्सच्या ब्रँड मूल्यासहअभिनेता रणवीर सिंग दुसऱ्या स्थानावर असून क्रिकेटपटू विराट कोहली १५८.४ दशलक्ष अमेरिकन डॉलर्सच्या ब्रँड मूल्यासह तिसऱ्या स्थानावर आहे.
  • क्रिकेटपटू विराट कोहली २०२४ सालच्या पहिल्या स्थानावरून तिसऱ्या स्थानावर घसरला आहे.
  • भारतरत्न पुरस्कार विजेते आणि दिग्गज भारतीय क्रिकेटपटू सचिन तेंडुलकर या यादीत चौथ्या क्रमांकावर (एकूण ब्रँड मूल्य - १२५.९ दशलक्ष अमेरिकन डॉलर्स) आहेत.
  • भारतीय पुरुष क्रिकेट संघाचा माजी कर्णधार महेंद्रसिंग धोनी (एकूण ब्रँड मूल्य - ११५.३ दशलक्ष अमेरिकन डॉलर्स) पाचव्या स्थानावर विराजमान झाला आहे.
  •  प्रसिद्ध भारतीय अभिनेत्री आणि निर्माती आलिया भट्ट ९३.९ दशलक्ष अमेरिकन डॉलर्सच्या एकूण ब्रँड मूल्यासह सहाव्या स्थानावर विराजमान होतानाच या यादीतील सर्वात मौल्यवान महिला सेलिब्रिटी म्हणून पुन्हा एकदा आघाडीवर राहिली आहे.
  • ८९.२ दशलक्ष अमेरिकन डॉलर्स इतके ब्रँड मूल्य असलेल्या दीपिका पदुकोणने सातवे स्थान पटकाविले आहे.